Discover and read the best of Twitter Threads about #LetsReadIndia

Most recents (11)

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
होय, मी पण एक कट्टर शिवभक्त आहे.फक्त मला शिवजयंतीला लावलेले डीजे,लाऊडस्पिकर,धांगड धिंग्यात काढलेल्या मिरवणूका आवडत नाहीत.त्या पेक्षा वर्षातले ३६५ दिवस सकाळी दिवस सुरू होताना महाराजांचं केलेलं स्मरण जास्त भावते.
1/n
@LetsReadIndia
मला पुतळ्यातले महाराज कधीही पटले नाहीत. काही चौरस मीटर च्या चौथऱ्यावर वसलेल्या त्या पुतळ्यापेक्षा पुस्तक रुपात आबालवृद्धां पर्यंत पोहचलेले माझ्या राजांचे विचार मला जास्त भावतात. 2/n
मला माझ्या राजाच्या मोठ्या स्मारकाची आशा कधीच नव्हती. उलट, वर्षाचे इतर ३६४ दिवस धुळीत माखलेल्या त्या पुतळ्याची जागा, मनातील धूळ नाहीशी करणारी वाचनालये कधी घेतील याची आशा कायम मनाला लागलेली असते. 3/n
Read 9 tweets
प्रस्तुत धागा कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकातील एका प्रकरणाचा सारांश आहे..
🚩
#शिवजयंती अष्टावधानी जाणत्या राजेंची..
#LetsReadIndia
@LetsReadIndia
#धागा
(१/९)
👇
शिवराय रयतेबद्दल खुप जागरुक असत.. त्या काळी सारख्या लढाया होत.. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमेसाठी फिरत असे.. उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई.. वर्षभर राबून रक्ताचा घाम करुन हातातोंडाशी आलेले पिक बघता बघता भुईसपाट होई..(२/९)
ज्याच्या राज्यात राहतो तेच सैन्य असे करीत असे, मग तक्रार कुणाकडे करणार? अन् दाद कुणाकडे माघणार?.. स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता..असे बेगुमान वागण्याची मुभा होती त्या काळात..(३/९)
Read 9 tweets
स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय दास्यापासून मुक्तता एवढाच मर्यादित अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यास प्राप्त होत नाही; तर परकीय सत्तेप्रमाणेच स्वकीय जुलमी लोकांपासूनही मुक्तता‚ हाही अर्थ स्वराज्यात अभिप्रेत होता!
त्याचबरोबर स्वराज्यात स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे‚ असाही त्यांचा आग्रह होता. या दृष्टिकोनातून महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याकडे पाहिले की‚ त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महत्ता द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.
केवळ प्रशासन‚ लष्कर‚ आरमार‚ दुर्ग‚ व्यापार‚ उद्योग या क्षेत्रांतच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरू केले असे नाही‚ तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रांतही नवे पायंडे पाडले‚ नवे दंडक निर्माण केले.
Read 6 tweets
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाची, संघर्षाची, मानवी क्रांतीची धगधगती मशाल…

महारिनिर्वाण दिनाच्या पुर्वसंध्येला त्यांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई इथे पार पडला.

आपण #LetsReadIndia च्या माध्यमातून अत्याधूनिक तंत्रज्ञानयुक्त #Library ऊभारण्याकामी खारीचा

१/१२ Image
वाटा उचलला.

हे संपुर्ण स्मारकच अत्यंत आकर्षक असून त्यात बाबासांहेबांच्या जीवनप्रवासवर अत्यंत वेगळे आणि सुंदर संग्रहालय, तसेच इतर अनेक बाबींचा समावेश आहे.

इथे वाचनालयात बाबासाहेबांविषयी पाच हजारावर पुस्तके तसेच ऑडीयो , व्हीडीओ आणि इबुक्स तर आहेतच शिवाय या सर्वांचे नियमन
२/१२ Image
तसेच पुस्तकांचे आदानप्रदान करण्यासाठी आपण लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमचे स्पेशल सॅाफ्टवेअर, आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी बुक बारकोडींग यंत्रणा, तसेच इतर सर्व आधूनिक तांत्रिक बाबी दिलेल्या आहेत.

हे अशा प्रकारचे डॅा. बाबासाहेब आंबेडकरांवरील पहिलेच स्मारक असेल जिथे इतक्या अत्याधूनिक
३/१२ Image
Read 12 tweets
तो दीड वर्षांचा असताना त्याच्या आईने आणखी एका मुलाला जन्म दिला, दुर्दैवाने तो तीनच महिन्यांत गेला. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला एक बहीण मिळाली; पण तीसुद्धा चार महिन्यांत गेली. पुढे अडीच वर्षांनंतर त्याच्या आईने चौथ्या मुलाला जन्म दिला; पण वर्ष होण्याच्या आत तेसुद्धा देवाघरी गेले.
भावंडांशी खेळण्याच्या वयात त्याने एकापाठोपाठ एक तीन भावंडं गमावली. त्या वेळी तोही लहान असल्याने त्यांचं जाणं त्याला समजण्याच्या पलीकडे होतं. त्यात घरातलं दु:खी वातावरण, ताण, आईचं रडणं यांमुळे तो जास्तच एकटा पडला आणि चिडचिडा झाला. यातून हळूहळू तो खूप हट्टी झाला.
तो तीन वर्षांचा होईपर्यंत बोलत नव्हता. अगदी क्वचित एखादं अक्षर उच्चारायचा. त्यामुळे ‘आपला एकुलता एक मुलगा मुका तर नाही ना’ अशी भीती त्याच्या आईला वाटायला लागली होती. म्हणून त्याच्या आईच्या वडिलांनी त्याला अक्षरं शिकवायचं ठरवलं. त्यासाठी ‘अक्षर अभ्यासम’ हा विधी करावा लागणार होता.
Read 14 tweets
Pfizer त्याचे covid-19 vaccine कसे बनवते ?

अमेरीकेतील Chesterfield व Missouri येथे trillions of bacteria ज्यात
'corona virus चे gene असलेले DNA'चे
loop बनवले जातात.
हेच Pfizer - BioNTech चे raw material.
ही Pfizer ची facility तीन राज्यात विखुरली आहे. लाखो डोस येथे बनवले जातात, Image
व गोठवून वितरित केली जातात.
ही किचकट प्रक्रिया अठरा स्टेपस मध्ये होते.

step 1: pull DNA from cold storage.
शास्त्रज्ञ Master cell Bank मधून DNAचेvial घेतात.ह्याvial-150c गोठवलेली असते त्यात DNA चे Ring असतात.त्याना plasmid म्हणतात.ते Immune response triggerकरायला कारणीभूत होतात. Image
हे Plasmid आणि e-coli bacteria एकत्र ठेवले जातात.
त्यामुळे plasmid, Ecoli मधे शिरतात Image
Read 20 tweets
आजही आपल्या भारतभुमीकडे पाहीलं तर एक गोष्ट जी भारतीय समाजव्यवस्थेला वाळवीप्रमाणे खाते ती म्हणजे जातीप्रथा.हे जातीव्यवस्थेचं मूळ उपटण्यासाठी महाराष्ट्रात भागवतधर्मी संतांनी अतोनात प्रयत्न केलेले दिसतात.काही संत तर याच व्यवस्थेने वाळीत टाकले,त्यातील एक होते #संत_चोखामेळा..! (१/१३)
तेराव्या ( इसवी सन १३०० ) शतकात उदयास आलेल्या निस्सीम विठ्ठल भक्ताबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच! ज्ञानदेवांनी संत लोकशाहीचा पाया रोवला होता.तोच भागवतधर्म नामदेवांनी आणि चोखामेळा यांनी तत्कालीन उपेक्षित ठेवलेल्या समाजापुढे आणून ठेवण्याचं काम चोखपणे पार पाडलं. (२/१३)
एक महार म्हणून जन्माला आलेल्या चोखोबां मरेपर्यंत भेदभाव आणि शिवाशिव, उच्चनीच, शुद्र अति शुद्र, सामाजिक जीवन व वर्णव्यवस्था या गोष्टींनी होरपळून निघाले होते.

लहानपणापासून विठ्ठल भक्तीची कास धरलेल्या चोखोबांनी अखेरपर्यंत ईश्वरभजनाची, नामस्मरणाची संगत सोडली नाही. (३/१३)
Read 13 tweets
हा नेहमी कुतूहल व वादाचा विषय राहिला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला ?

•1936 मध्ये Annihilation of casteया ग्रंथात आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाचा निर्णय जाहीर केला •पण1956मध्ये Buddhism स्वीकारला.
#AmbedkarJayanti #LetsReadIndia
दोन दशके त्यांनी सर्व मुख्य धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर बौद्ध धर्माची निवड केली.

बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला?

'Buddha and future of his religion'या निबंधात याचे उत्तर दिले आहे.

1950 मध्ये कोलकत्ता येथील Mahabodhi societyचे मासीक मध्ये हा निबंध प्रकाशित केला
या निबंधात त्यांनी Buddha,Jesus,Muhammad,Krishna या चार धर्माच्या मुख्य personality ची तुलना केली आहे.
त्याच्या मतानुसार ह्या धर्मानी;
'Have not only moved the word in the past but are still having sway over the vast masses of people.'
Read 10 tweets
आपण जर आज आपल्या घटनेची उद्देशिका वाचली तर सहज लक्षात येईल की ज्या देशाला विचार, व्यक्तीस्वातंत्र्य, जातीव्यवस्था, विद्वेष, जन्मजात विषमता, शिक्षणाचा अभाव, बहुतांश ग्रामीण भाग याचा शेकडो वर्षांचा पाया होता, प्रभाव होता त्या देशाने ही राज्यघटना त्या काळी कशी स्वाकारली असेल. १/६ Image
मला निःसंशय तेंव्हाची आपली भारतीय पिढी आजपेक्षा वैचारीक दृष्ट्या अधिक प्रगल्भ वाटते.

आजच्या दिवशी आपण भारतीयांनी “स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय यांच्या मुलभूत पायावर उभ्या असलेल्या महान राज्यघटनेचा स्वीकार केला.

खरे पाहता आपली भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ ही २/६
ब्रिटीशांविरूद्ध तसेच एकाचवेळी इथल्याच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाबींवर सुरू होती.

ज्या धर्मरूढींनी, राजेशाहीने आणि वर्णवर्चस्ववादी परंपरेने विषमतावाद जोपासला होता त्या विरूद्ध ती चळवळ कडालली आणि जिंकलीही.

आजही आपण आपल्या देशाच्या राज्यघटनेतील या मुल्यांचा अंगीकार केला ३/६
Read 7 tweets
मराठी ग्रामीण कथा असो वा साहित्य एक नाव नेहमी अजरामर राहील ते म्हणजे 'साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे' ,मराठी सारस्वताने अनेक लेखक कवी नाटककार पाहिले आहेत पण अण्णाभाऊ साठेंच साहित्य ह्या सर्वांच्यात उठावदारी व वास्तववादी आहे.
अण्णाभाऊंनी लिहलेल्या कादंबरीतील नायक व नायिका हे प्रतिनायक किंवा न-नायक नाहीत तर ते न्यायासाठी जीवदान द्यायला तयार असणारे धीरोदात्त नायक आहेत.त्यातील एक आवडती कादंबरी म्हणजे #फकिरा ही कादंबरी लढणाऱ्या माणसाची कादंबरी आहे. फकिरा कादंबरी ग्रामपातळीवरील संघर्षाची कथा आहे..
सत्यासाठी लढणाऱ्या फकिरचे दर्शन अण्णाभाऊंनी अत्यंत ग्रामीण भाषेत यथार्थपणे घडविले आहे...
#letsreadindia
@LetsReadIndia
Read 3 tweets
काहीतरी करावं अशी खुमखुमी असलेल्या वयात हातात पडण्यासाठी सर्वात योग्य पुस्तक म्हणजे अनिल अवचट यांचे "कार्यरत". सामाजिक जाणिवेसाठी ज्ञात असलेले अवचटसर या पुस्तकातून आपल्याला अविरत कार्यरत अशा सात दिग्गज व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देतात.

@LetsReadIndia
#LetsReadIndia
#मराठी
१.मुंबई कायमची सोडून पनवेलजवळच्या तारा गावात राहून रायगड परिसरातल्या कातकरी जनतेसाठी पाडोपाडी मैलोनमैल अर्धपोटी चालण्याऱ्या सुरेखाताई दळवी यांची गोष्ट विलक्षण आहे. लाकडी कोळसा उद्योगात कातकरी लोकांना अक्षरश: पिळणाऱ्या आणि डोंगरच्या डोंगर उजाड करणाऱ्या मालकांविरुद्ध दिलेला लढा,
बेसुमार आणि पर्यटनवादी शहरीकरणामुळे लगतच्या आदिवासी जीवनावर येणाऱ्या दबावाविरुद्ध दिलेला लढा, सरकारी
-सावकारी संगनमताने हडपलेल्या "दळीच्या" जमिनी पुन्हा त्या कसणाऱ्या कातकरी जनतेच्या नावावर करण्यासाठी लढा लढणाऱ्या लढाऊ सुरेखाताईंची गाथा वाचनीय.
Read 13 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!