Discover and read the best of Twitter Threads about #सत्यकथा

Most recents (11)

साधारण २००१ ते २०१२ ही सलग ११ वर्ष माझ्या आयुष्यात अत्यंत वेगवान, धावपळीची अन प्रचंड उलथापालथीची होती.

त्यात २००४ मधला २५ एप्रिल माझ्या आयुष्यात सर्वात भयंकर,जीवघेणा.

संपुर्ण कुटुंबाला हादरवणारा होता. कधीही न विसरता येणारा.

#SaturdayThread #BusinessDots #सत्यकथा #मराठी
१/२४
तेंव्हा मध्यप्रदेशमधे मी एका हिटिंग फर्नेसचा मोठा प्रोजक्ट हेड करत होतो.

काही डेडलाईन्स पाळायच्या असल्याने मी सलग पंधरा-पंधरा दिवस साईट २४ तास साईट रोटेशन पद्धतीने (दोन शिफ्टमधे) चालू ठेवायचो.

फक्त झोपायला जवळच्या हॅाटेलवर यायचो बाकी सलग १६- १८ तास साईटवरच जायचे. असेच एक
२/२४
दिवस काम संपवून रात्री उशीरा २ वाजता हॅाटेलवर पोहचलो, आंघोळ, जेवण करून झोपायला ३ वाजले.

नुकतीच झोप लागलीच होती की साधारण साडेतीन- चार वाजता माझा मोबाईल वाजला…. तो साईटवरील एक सहकारी सतिशचा होता, मी फोन लगेच उचलला, त्याचा आवाज प्रचंड घाबरलेला होता - एका दमात तो म्हणाला -
३/२४
Read 24 tweets
युवराज आणि मी दोघे सोबतच मुंबईत आलो होतो. तो कोल्हापुरचा.

पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की रांगडा गडी, बोलायला कडक आणि बिनधास्त अशी एक आपली सर्वसामान्य समजून असते. पण युवराज या सर्वांना अपवाद!

तो एकदम मितभाषी, शांत तसेच निर्व्यसनी.

#SaturdayThread #मराठी #BusinessDots #सत्यकथा 👇
आमची काही पुर्वी ओळख नव्हती, मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंगमधे तो ही एका कंपनीत काम करायचा. आमची दोघांचीही सकाळी जायची एकच वेळ होती त्यामुळे येताजाता दिसायचा.

मुंबईत येऊन मला एक महिनापण झाला नव्हता. लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती वाटायची, पहिल्यांदा ट्राय करायला गेलो
👇
आणि जाम चेंबलो गेलो, अगदी भूगा झाला त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचो.

एक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे बसमधे शिरलो आणि अचानक युवराज पण त्या बसमधे मला दिसला. मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. त्यानेही मला लगेच ओळखले. बस सूरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी
👇
Read 31 tweets
मागच्या महिन्यातल्या एके दिवशी इयरएंड ॲक्टीव्हिटीज संपवून मी ऑफिसमधे निवांत बसलो होतो.

संध्याकाळची वेळ होती आणि बऱ्यापैकी रिलॅक्स मुड होता, कामं आटोपल्याने मी एक नवीन पुस्तक वाचायला घेतलं. १०/१२ पानं वाचत चांगला तल्लीन झालो.

#SaturdayThreads #BusinessDots #मराठी #सत्यकथा
१/१४
तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडून एक सहकारी आत आला आणि म्हणाला की माझा एक अत्यंत महत्वाचा व्हीडीओ कॅाल चालू आहे आणि तो बराच वेळ चालणार आहे.
आता ट्रेनी इंजिनियर पदासाठी एक मुलगा इंटरव्हूवला आलाय.

खरतर त्याला सकाळची वेळ दिली होती पण कदाचित प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध
२/१४
न झाल्याने तो उशीरा आलाय आणि आता कोविडकाळात इतका वेळ त्याला बसवून ठेवणे योग्य नाही. तुम्हाला वेळ असेल तर त्याला भेटता का?

मी तसाही निवांतच होतो आणि बरेच दिवस असा इंटरव्हूव घेतला नव्हता, तसं माझ्यासाठीच ती संधी वाटली आणि लगेच त्या मुलाला आत पाठवून द्यायला सांगितले.
३/१४
Read 14 tweets
परेशभाई (नाव बदललेय),माझ्यापेक्षा १०/१२ वर्षांनी मोठे. माझा परिचय झाला साधारणपणे १७/१८ वर्षांपूर्वी, त्यांच्या काही हिटींग प्रोसेसमधे त्यांना नवे बदल करायचे होते म्हणून कंपनीने मला एनर्जी ॲाडीट करण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले.
#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #सत्यकथा #मराठी १/१८
त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका आणि हरहुन्नरी. नॅानटेक्निकल असले तरी प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने लक्ष देणार.
परेशभाईंचा मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटूंबात जन्म, हायस्कूलपासून शिक्षण करतच वडीलांच्या किरानामालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे नियामाप्रमाणे बी.कॅाम केलं आणि
२/१८
एखाद दोन वर्षात स्वत:चा फॅब्रिकेशनचा छोटासा गाळा घेऊन काम सूरू केलं.व्यवसाय वाढविताना मोठ्या कंपन्यासोबत ज्या ओळखी झाल्या त्याचा पुरेपुर वापर करत त्यांचे व्हेंडर झाले. समाजाकडून बिनव्याजी आर्थिक मदत घेतली. वडिलांचे दुकानही सुरूच होते आणि त्यामुळे इकडे चांगला जम बसविला.
३/१८
Read 18 tweets
माझ्या आयुष्यातील कॅार्पोरेट करियर मधील तो सुवर्णकाळ होता. भारलेले, झपाटलेले दिवस. वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात २४/२५ व्या वर्षीच मला थरमॅक्ससारख्या प्रतिथयश,संपुर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती. सतत
#SaturdayThread #BusinessDots #मराठी #सत्यकथा १/१८
काम,नवीन शिकण्याची आस त्यामुळे सतत दौरे आणि मिटींगा चालू असायच्या.

त्या काळात मी बॉयलर्स आणि औष्णिक ऊर्जा विभागात आंतरराष्ट्रीय सल्लागार (जे बऱ्याच कारखान्यांना इंजिनियरींग सर्विसेस देतात) हे डिपार्टमेंट पहायचो. औष्णिक तंत्रज्ञान आणि इंधनाचे ज्वलन हा माझा आवडीचा विषय त्यात
२/१८
वायुरूप इंधनाची भारतातील जवळजवळ प्रत्येक केस माझ्या नजरेखालून जायचीच.

एक दिवस संध्याकाळी घरी जायच्या तयारीत असताना मोबाईल वाजला आणि पलीकडून ऊद्या सकाळी १० वाजता दिल्लीत मिटींगसाठी हजर व्हा असा निरोप मिळाला.

ही अत्यंत प्रतिष्ठेच्या कंपनीसाठीची किक ॲाफ मिटींग होती आणि जर
३/१८
Read 18 tweets
२००९ हा आयुष्यातील तोपर्यंतचा अत्यंत कठीण आणि भावनिकदृष्ट्या कधीही न विसरता येणारा काळ होता.

बाबांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आणि पुढे मेंदूचे ऑपरेशन,त्याचवेळी भावाचा मोटारसायकलवरून पडून अपघात आणि पाय फ्रॅक्चर,माझ्या एका पायात #SaturdayThread #BusinessDots #मराठी #सत्यकथा १/१८
साईटवर दगड घुसल्याने पाय सुजलेला तर कंपनीत प्रचंड गोंधळ...

नवा व्यवसाय,प्रस्थापितांच्या समोर फक्त तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान एवढेच काय ते आमचे भांडवल. बरं त्यात आमची सर्व टिम १९/२२ वयोगटातली,प्रचंड मेहनती,कष्टाळू पण आम्हा सर्वांकडेच तशी बऱ्याच इतर गोष्टींची, अनुभवाची कमतरता
२/१८
होती. त्यात कौंटूबिक पातळीवर प्रचंड संकटाची मालिका.

कोणत्याही कंपनीत सेल्स जेवढे महत्वाचे तेवढेच परचेसही. मला तर सर्वच आघाड्यांवर पळावे लागायचे, आमच्याकडे त्याकाळी बरेचशे व्हेंडर नवे होते. (आज तेच आमचे ७०% हून जास्त व्हेंडर आहेत जे आता १४ वर्षापासून आम्हाला सेवा देताहेत)
३/१८
Read 18 tweets
पहिल्याच कंपनीत मी ट्रेनी म्हणून काम करत असताना शामसाहेब (नाव बदललेय) त्या कंपनीचे मुंबई युनिटचे सर्व्हिस हेड होते.

माझ्यापेक्षा १०/१२ वर्ष मोठे. नागपूरच्या VNIT मधून इंजिनियरींग केलेले.अत्यंत हुशार,तल्लख, आम्हाला लहान भावासारखे
#SaturdayThread #मराठी #BusinessDots #सत्यकथा👇
वागवायचे.

फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे, पाहिजे ते घ्या म्हणायचे आणि मग अक्षरश: धुमाकुळ... आम्हालाही जणू आमच्या घरातीलच माणसासारखे वाटायचे. माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे प्रमुख कारण हे त्यांच्यासोबतच्या अशा जेवणावळीच होत्या.

यात मी सांगितलेला 👇
पदार्थाचा इतिहास, भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा मला ते बाहेरच्या राज्यात जावूनही कुठे काय खावे हे मला विचारायचे.

त्यांना कामासाठी कधीही फोन करा, कितीही किचकट प्रश्न असला तरी कायम उत्तर तयारच असायची, फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव, थर्मल इंजिनियरींगचे 👇
Read 25 tweets
काही दिवसांपूर्वी एका तरूण मित्राचा फोन आला, काम झाल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला कि तुम्ही इंटरव्युव्ह घेताना काय प्रश्न विचारता? त्या उमेदवारकडून काय अपेक्षा असतात?

त्यावर मी म्हणालो की “मी फार प्रश्न न विचारता...
#SaturdayThread #सत्यकथा #BusinessDots #मराठी #म
१/१६
माझ्या इतर सहकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तो उमेदवार कशी उत्तर देतो हेच ऐकत असतो... अगदी क्वचित मी काही प्रश्न विचारतो.”

तरूण फ्रेशर इंजिनियर्सच्या बाबतीत मात्र हल्ली फार आशादायी चित्र दिसत नाही, एकतर भरमसाठ “होलसेल” अभियांत्रिकी कॅालेजांमुळे दर्जा खुपच घसरलाय आणि २/१६
त्यांना इंजिनियरींग किंवा तंत्रज्ञानविषयक प्रश्न फार आवडत नाहीत असे माझे निरिक्षण आहे त्याऐवजी ते Extra-curricular Activities बद्दल भरभरून बोलतात त्यामुळे सहसा मी ते टाळतो.

पण काही महत्त्वाच्या जागांसाठी मात्र मी कटाक्षाने इंटरव्युव्हज ऐकतो,पाहतो,घेतो, यातीलच हा एक किस्सा ३/१६
Read 16 tweets
- माणुस Keyच्या जादूचे प्रयोग -

“बोल साहेबा,काय सेवा करू तुझी?
काय घेणार चहा, कॉफी कि ग्रीन टी?”

हा प्रश्न मला एका मोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने अतिशय आपुलकीने विचारला होता.
मी त्यांच्या ॲाफीसमधे बहुतेक वर्ष-दिड वर्षानंतर 1/15

#MyStory #BusinessDots #सत्यकथा #मराठी #म
काही महत्त्वाच्या Technical Discussion साठी गेलो होतो. आमचे ऋणानुबंधही तसे चांगले आहेत.

त्यांनी लगेच बेल वाजवली आणि दरवाज्यातून त्यांचा ॲाफीसबाॅय आत आला, मी त्या ॲाफीसबाॅकडे पाहिले आणि म्हणालो - “सतिशला माहित आहे”

आणि त्यानेही हलकेच हसून मान डोलावली... 2/15 #SaturdayVibes
साहेबांकडे पाहून सतिशने “तुम्ही, काय घेणार सर? असे विचारले, साहेबांनी त्याला त्यांच्यासाठी काॅफी आणायला सांगितले. तो ही लगेच केबिनमधून बाहेर गेला.

जाताजाता मला एका हाताने नमस्कार केला आणि मी ही त्याला तसाच प्रतिसाद दिला.

“तु या सतिशला कसा काय ओळखतोस? आणि तो ही तुला कसा?”3/15
Read 15 tweets
व्यवसायाच्या सुरूवातीला आमचे ठराविक असे एक दोन खुप मोठे आणि महत्वाचे ग्राहक होते...(आजही ते तेवढेच महत्वाचे आहेत) एकदा त्यापैकी एका कंपनीत नवीन बाॅस बदलून आले. एक महिनाभर होऊनही ते मला टाळत होते.

मला ते अगदी स्पष्ट जाणवतही होते..
1/18

#MyStory #BusinessDots #सत्यकथा #मराठी #म
मी तासन् तास त्यांच्या ॲाफिसच्या बाहेर वाट पहात बसायचो,त्यांना ते दिसायचेही पण ते वेळ द्यायचे नाहीत.

आमच्या क्षेत्रात तेव्हा आमची कंपनी नवखी असली तरी जे तंत्रज्ञान आणि त्यातला अनुभव जो आमच्याकडे होता तो अगदी भारतातल्या सर्वात मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेही नव्हता. 2/18
व्यावसायिक दृष्ट्याही आम्ही कुठेही कमी नव्हतो पण काही केल्या नवे साहेब वेळच द्यायला तयार नव्हते..
नजरानजर झाली तरी ते इतक्या खालच्या पातळीने पहायचे की माझीच मला लाज वाटायची..आणि मी ओशाळून जायचो, तिथले ॲाफीसबाॅय,रिसेप्शनचे लोक ही मला हसायचे,हळूहळू मला काय कळायचे ते कळाले होते.3/18
Read 18 tweets
काही दिवसांपूर्वी पुण्याला निघालो होतो तेव्हाची ही गोष्ट....

काॅफी घेण्यासाठी पेट्रोल पंपावर ब्रेक घेतला,गाडीतून उतरताच एक मित्र समोरच कॉफीशॉपवर भेटला आणि मग काय, लगेच मस्त गप्पा सुरू झाल्या.काॅफी संपतच आली होती तेवढ्यात अचानक माझा ड्रायव्हर (तो नुकताच

#सत्यकथा #मराठी #म 1/14
आमच्या कंपनीत रूजू झाला होता,नवाच तसा) कॅफेमध्ये आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे! कॉफी संपली की लगेच गाडीकडे या”

आम्ही दोघे घाईघाईने गाडीकडे निघालो, थोडे काळजीतच होतो, तिथे पोहोचताच ड्रायव्हर म्हणाला,“हे बघा! मी गाडीवरचे स्क्रॅचेस, डाग कसे एकदम चकाचक केले! 2/14
गाडी पुन्हा नव्यासारखी चमकत आहे आता !!!”

तो अतिशय आनंदाने सांगत होता, म्हणाला .. “मला आपल्या गाडीसाठी नवीन कारक्लिनींगचे किट भेटलेय....

जर हे आपल्या इतर रंगाच्या गाड्यांवर ही चांगले चालले तर पुढच्या वेळी परत आपण अजून काही सेट घेऊ.”

'व्वा, क्या बात है, फारच छान !! 3/14
Read 14 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!