Discover and read the best of Twitter Threads about #शेतकरी

Most recents (9)

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ₹ 12000/- मिळणार .
#NamoShetkariYojana #शेतकरी #म #मराठी Image
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आली.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता केंद्राच्या योजनेसोबतच मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
Read 6 tweets
वाचा व विचार करा
२०१३ मध्ये मी कापूस ७५००/ रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि २०२३ ला कालच मी कापूस ७९००/ रुपये प्रति क्विंटल विकला आहे फरक इतकाच आहे २०१३ मध्ये डिएपी ५६०/- रुपया ला एक बॅग होती आज १९००/ रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी ०३/रुपये किलो होती
आता १५/-रुपये किलो आहे मजूर तेव्हा ४००/ रुपया ला गॅस भरत होता आज आज १२००/ रुपये ला झालाय.२०१३ ला ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर मशिन ६,००,००० रु सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर ११,००,०००रु लागत आहे तेव्हा मिळणारी १५,०००/- रुपये ची बैलजोडी आज ५५,०००+ रुपये हजाराची झाली
आधी ५०,००० ला मिळणारी मोटासायकल जिच्यात लोक ६० रु लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिर्वाहासाठी दोन पैसे कमवत होते आज तिचं गाडी १,१०,००० वर नेऊन ठेवली आणि तिचे पेट्रोल ११० वर गेलं..
Read 10 tweets
कांदा प्रकरण सत्य काय ?

पुढील सर्व करायची वेळ आली नसती, जर..

- केंद्रीय मंत्रांना घेराव,
- रस्तात कांदा वा इतर उत्पादन फेकुन निषेध
- शिंदे, फडणविसांचा ताफा अडवुन गाजावाजा
- विधीमंडळात कांद्याचे हार घालुन, कांद्याच्या टोपल्या घेऊन निषेध

ते "तीन कृषी कायदे" परत घेतले गेले नसते
शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. त्यांचा राजकारणा साठी वापर केला जातो, हे कित्येक दशकां पासुन स्पष्ट आहे

तथाकथीत शेतकरी संघटना, शेतकरी नेते ह्यांच्या लबाडी पासुन सावध व्हावे

- APMC ची सक्ती का ?
- बांधावर व्यापाऱ्यास का विकता येत नाही
- गरीब शेतकऱ्याची जमीन जर कंत्राटी
पध्दतीने कसुन, त्याला फायदा मिळत असेल तर इतरांना पोटदुखी का ?

उत्तर :- तीन कृषी कायदे

#Team_Saffron
@BJP4Maharashtra
#शेतकरी
Read 3 tweets
२०२२ पर्यंत शेतकर्यांच ऊत्पन्न दुप्पट करु त्यांनी सांगितलं आणि आम्हीही विश्वास ठेवला हो,पण होत असलेलं ऊत्पन्नही तुम्ही काढुन घेतलं हो,आज हा व्हिडिओ बघुन डोळ्यात पाणीच आलं,६५ वर्ष वय झालयं शेतीचा हिशोब बसत नाही हे वाक्य अगदी मनाला लागलं,आज शेतकर्यावर ईच्छामरण मागायची वेळ आलीय,
याला जबाबदार कोण? सरकार सांगतय निर्यात चालुय मग भाव का वाढत नाही? परवा असाच एक नाशिकमधला व्हिडिओ बघितला जीथं शेतकरी मेथी फुकट विकत होता,मोठ्या मनानं त्याने वाटलीही असेल फुकट पण घेणार्यांना लाजा वाटु नये? त्याच मनही तुम्हाला शिव्या देत असेल घ्या फुकट्यांनो विकत घेऊन खायची
तुमची लायकी राहिलेली नाही,एक आमच्याच तालुक्यातील असलेल्या ताईचा व्हिडीओ बघितला जी मोदी-शिंदेंना शिव्या देत होती,चार-चार पोरी आहेत लग्न कशी करायची होती,तीच्या प्रश्नाच ऊत्तर कोण,कसं देणार? धार्मिक तुष्टिकरण करुन तुम्ही मत मिळवालही हो पण देशातल्या सर्वात मोठ्या व्होट बँक असलेल्या
Read 4 tweets
तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..
बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्‍याने लाखाच्या कर्जाला किमान १०हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज
वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० हजार काढुन घेतलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपये ढापलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन
टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फॅट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारावरच्या ईलेक्शन जिंकु.
व्याजानं पैसं देणारा सगळं सोनं-नाणं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिर्‍हाईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर
Read 9 tweets
#किसानपुत्र_आंदोलन - ✍️कृष्णा तट

आज #कृषिदिन पण कृषी दिनानिमित्त शुभेच्छा द्याव्या की न द्याव्या हाच प्रश्न मला पडलाय?
कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत #शेतकरी हा स्वतंत्र झालाच नाही किंवा अस म्हणा की त्याला स्वातंत्र्य दिलेच नाही. #farmer #freedom #NoIndependence
खऱ्या अर्थाने २६ जानेवारी १९५० भारतीय राज्यघटना लागू करून भारत प्रजासत्ताक झाला खरा पण लगेचच १९५१ साली घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये ९वे परिशिष्ट जोडून आणि त्यामध्ये #शेतकरी_विरोधी_कायदे टाकून परत शेतकऱ्याला पारतंत्र्यात टाकले.
#antifarmerlaws #constitutionalban #nyaybandi
आणि आजपर्यंत एकाही राजकारण्यांना अस वाटलं नाही की शेतकऱ्यांना स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी किंवा त्यांच्या मालाचा भाव त्यांनी ठरवावा अस का? आणि केव्हांपर्यंत?
तुमच्या इंडियच्या विकासासाठी फक्त ग्रामीण भारतातीलच शेतकरी आहे का? #freeMarket #msp #croploan #antifarmerlaws
Read 4 tweets
लायकी दाखवण्याचे दिवस

बुधवार, 29 एप्रिल 2020

गवार वीस रुपये...
कलिंगडं शंभरला तीन!

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. १/१३

#साभार #शेतकरी
कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डुलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. २/१३
दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो. इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकीये. तिथं पे.’ असा सल्ला दिला. ‘ ३/१३
Read 13 tweets
किमान एवढे करूया!*
उद्या सोमवार आहे
प्रत्येक किसानपुत्राने
'शेतकरीविरोधी कायदे रद्द करा'
या आशयाची एक पोस्ट
सोशल मीडिया वर पोस्ट करावी
अशी अपेक्षा आहे.
सिलिंग, आवश्यक वस्तू किंवा जमीन अधिग्रहण या पैकी कोणा एका कायद्याचा शेतकऱयांच्या जीवनावर कसा दुष्परिणाम झाला
या विषयी
बोलून व्हिडीओ तयार करा किंवा
लिहून पोस्ट तयार करा
आपले सर्व मित्राना व्यक्तिशः
आपले सगळे ग्रुप
फेसबुक, व्हाट्स अँप, ट्यूटर इत्यादी द्वारे पाठवा
किसानपुत्रांच्या इतक्या पोस्ट पाडाव्यात की सर्वांचे लक्ष वेधले जावे!
ज्याने त्याने शेतकरी स्वातंत्र्यासाठी #शेतकरी _विरोधी_कायदे रद्द करणे किती निकडीचे आहे याचा विचार करावा.
हे कायदे रद्द करणे सरकारला भाग पाडणारी नवी शक्ती उदयाला यावी.
लक्षात ठेवा,
*तुमच्या एका थेंबानेच*
*स्वातंत्र्याचे बी अंकुरणार आहे!*

-अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन
8411909909
Read 3 tweets
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट गावातले दत्ता असलकर नावाचे शेतकरी. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी दोन गायी विकत घेतल्या , एक गाय ७०००० रुपयांना पडलेली.दुष्काळाची तीव्रता जशी वाढली तशी चाऱ्याची टंचाई वाढली.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
त्यामुळे ह्या गायी विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. गायींसाठी पाच लाख खर्चून बांधलेला गोठा रिकामा पडलेला आहे. कारण ह्या गायी सोबत त्यांच्या आधीच्या चार अश्या एकूण सहा गायी विकाव्या लागल्यात.त्याही फक्त २५००० रुपयांना एक ह्या प्रमाणे
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
सगळा व्यवहार फक्त तोट्याचा.उपलब्ध सरकारी आकडेवारी नुसार एकट्या भूम तालुक्यात ८९००० प्राणी आहेत ( गायी-म्हशी ) दुष्काळाची तीव्रता अशी आहे कि पर्यायी उत्पन्नाच साधन असलेल पशुधन गमवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
Read 15 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!