Discover and read the best of Twitter Threads about #महाराष्ट्रदिन

Most recents (17)

#MaharastraDay
1947లో స్వాతంత్ర్యం తరువాత బొంబాయి ప్రెసిడెన్సీలో మహారాష్ట్ర ప్రాంతం, విదర్భ, నాగపూర్, వాటితో మరికొన్ని రాజ సంస్థానాలు విలీనం చేసి 1950లో బొంబాయి రాష్ట్రం ఏర్పాటు చేశారు. 1960 మే 1న బొంబాయి రాష్ట్రాన్ని విభజించి మహారాష్ట్ర, గుజరాత్ రాష్ట్రాలను ఏర్పాటు చేశారు.
మహారాష్ట్ర, (మరాఠీ: #महाराष्ट्र ) భారతదేశంలో వైశాల్యపరంగా మూడవ పెద్దరాష్ట్రం, జనాభా పరంగా రెండవ పెద్ద రాష్ట్రం (ఉత్తరప్రదేశ్ తరువాతి స్థానం). మహారాష్ట్రకు గుజరాత్, మధ్యప్రదేశ్, ఛత్తీస్‌గఢ్, తెలంగాణ, కర్నాటక, గోవా రాష్ట్రాలతోనూ, కేంద్రపాలిత ప్రాంతమైన దాద్రా-నగరుహవేలి తోనూ
సరిహద్దులున్నాయి. పశ్చిమాన అరేబియా సముద్రం ఉంది. ముంబయి నగరం మహారాష్ట్ర రాజధాని, అతిపెద్ద నగరం.
మహారాష్ట్ర ప్రాంతము ఋగ్వేదంలో రాష్ట్రఅనీ, అశోకుని శాసనాలలో రాష్ట్రీకము అనీ, అతరువాత హువాన్‌త్సాంగ్ వంటి యాత్రికుల రచనలలో మహారాష్ట్ర అనీ ప్రస్తావింపబడింది.
Read 6 tweets
आजमितीस महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी आपण महाराष्ट्राच्या बाजूलाच ऊभे रहायला हवे. हाच महाराष्ट्रधर्म आहे.
या देशावर अन महाराष्ट्रावर आतोनात प्रेम आहे म्हणूनच ही मातृभूमी “कर्मभूमी” म्हणून निवडलीये.
आज राज्यसरकार लस मोफत
१/९

#महाराष्ट्रदिन #SaturdayThread #मराठी
देतेय याचा मनापासून आनंद आहे.

प्रत्येक सुज्ञ नागरिकाला हे कळतेय की आज सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. परंतु या अवस्थेतही लोकांचे जीव अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम ऊपाय आहे.

सरकारच्या या निर्णयाचे फक्त टाळ्या वाजवून स्वागत करण्यापेक्षा त्यांना
२/९
आपल्याला जी शक्य असेल ती आर्थिक मदत “ऐच्छिक” स्वरुपात देणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजतो.
जर आपल्या मदतीने कोणाचे प्राण वाचणार असतील तर त्यासारखे दुसरे पुण्यकर्म कोणतेही नाही.

खरतर मी अशा केलेल्या मदतीचा बाजार मांडत नाही,परंतु काही सहृदयी मित्रांच्या आग्रहामुळे व्यक्त झालोय.
३/९
Read 9 tweets
सणाच्या पहाटेचा पहिला प्रहर..आदल्या दिवशी रात्री १२ वाजेस्तोवर का जागलेली असेना ती.. त्यादिवशी पहाटे ३ च्याटोलला तिनं उठावं..डाळ शिजत घालावी..लगबगीनं पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवावी आणि पाटा-वरवंटा घेऊन डाळीचं पुरण वाटावं..सणासुदीला आईचा बेत असतो पुरणपोळीचा.
#खाद्यसंस्कृती #थ्रेड #म
समाजाला जशी संस्कृती असते..तशी ती खाद्यपदार्थांनाही असते.. पण या दोन्ही संस्कृतींचा भार स्त्रियांच्या खांद्यावर असतो.. बाकी पुरुष नुसते बडेजाव मारण्यातच पुढं असतात..बहुतांश वेळा.
पाट्यावरच्या कणकेला वरवंट्याचे घाव घालणारी आई..प्रत्येक घावाला तिनं प्रेम ओतावं..त्याचीच चव आम्हाला.
लोहाराचा भाता चालावा तशी चूल धगधगावी..त्या धगित तापलेल्या तव्यावर पुरण भरून लाटलेली पोळी पडावी..अखंड दुरडी भरस्तोवर तिनं पोळ्यांचा रतीब घालावा..पोराबाळांना चांगल्या दोनरोज पुरतील एवढ्या पोळ्या तिनं दिवस उगवायला बनवाव्यात.
तांबडं फुटायला तिनं येळवणीच्या आमटीला फोडणी दिलेली असते.
Read 12 tweets
@LetsReadIndia
#महाराष्ट्रदिन
#खाद्यसंस्कृती
विषय जिव्हाळ्याचा आहे म्हणल्यावर व्यक्त व्हायला हवं. महाराष्ट्रात परिपूर्ण आहार जितका समृद्ध आहे तितकेच महत्त्वाचे इतर पदार्थ सुद्धा आहेत. चटण्या लोणची या जेवणाची अधिक लज्जत वाढवतात.१/५
लाल तिखटाची शेंगदाणा चटणी, काराळ्याची चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी अत्यंत आवडीची. काही ठिकाणी कवठाची, चिंचेची गोड चटणी करतात. ओला नारळ किसून केलेली चटणी तर अप्रतिम. पेरू चिरून त्याला फोडणी देऊन केलेली चटणी तोंडाला पाणी आणते.२/५
कच्च्या कैरीचे खारे लोणचे, तिखट लोणचे, करंवंदाचे लोणचे, ओल्या हळदीचे लोणचे, लिंबू-मिरचीचे खारे लोणचे, आवळ्याचे लोणचे, लिंबाचे गोड लोणचे, मुरांबा गुळांबा उन्हाळा अधिक सुसह्य करतात.३/५
Read 5 tweets
पणजी, आजी आणि आई तिघींकडून जुन्या उत्तमोत्तम पाककला शिकायला मिळाल्या. साध्या जिन्नसांपासून तयार केलेले महाराष्ट्रीयन पदार्थ आजही तेवढेच प्रिय. हिवाळ्यात हुलग्यांपासून बनवलेलं तिखट माडगं, शिंगोळे तर पणजीची खासीयत. १/n
#महाराष्ट्रदिन
@LetsReadIndia
आजी लाल जोंधळ्यांची जाड भाकरी करायची त्यावर पाट्यावर वाटून केलेला हिरव्या मिरची लसणाचा झणझणीत खर्डा, तेल मिरची कच्चा कांदा टाकून केलेले तोंडलावणी म्हणजे केवळ अमृतचं. दोडका वाटून त्यात हिरवी मिरची ,लसूण टाकून दोडक्याचा ठेचा व्हायचा बाजरीच्या भाकरीसोबत खायला मजा यायची.२/n
उन्हाळ्यात केलेला सांगा वर्षभरासाठी आयत्या वेळेची भाजी म्हणून तयार असायचा. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कुरडया सणासुदीला कुरकुरीत पणा आणायच्या. गव्हाच्या शेवया उन्हाळ्यात आमरसाबरोबर साजूक तूप टाकून तृप्ती द्यायच्या.३/n
Read 7 tweets
घटना साधारणपणे २०१७ ची..
पुण्यात होतो.शेती विषयक एक कार्यशाळा अटेंड करायचा बेत होता.विषय होता 'शेतीचा अर्थ'.
त्याच दिवशी केंद्र सरकारचे मुख्य अर्थसल्लागार सुब्रमण्यम झंझावाती अस काही बोलले.ते म्हणाले 'शेतकऱ्यांना आता प्राप्तिकराच्या जाळ्यात घ्यायला हवं.'
#महाराष्ट्रदिन #म #थ्रेड
बराच खल झाला तेंव्हा या विषयावर.. बरीच टीका झेलावी लागली सुब्रमण्यमनां.
१९२५ साली कर परिषदेत मागणी होती शेतकऱ्यांना कर लावा अशी.. आज आणिएक ४ वर्षांनी शंभरी होईल त्या मागणीची.. आज २१ सालीही निर्णय नाहीय त्यावर..शेती खरंतर भारतीयांना जिव्हाळ्याचा विषय..अलीकडे तर खूपच sympathy.
म्हणजे गेल्या शंभर एक वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहिलं..पण शेतकऱ्यांचं उत्पन्न काही करपात्र करता आलं नाही आपल्याला..म्हणायला फक्त शेती ही काळी आई आणि शेतकरी बळीराजा आहे..गेल्या शतकभरात जी काही वाताहत त्या आईची आणि लेकरांची झालीय ती शब्दात सांगायची सोय नाही.
शेती राज्यसूचीत येते.
Read 27 tweets
" महाराष्ट्रातील कला " म्हणलं तर सर्वात आधी नाव येत त्या इथल्या जगप्रसिद्ध अश्या लेण्यांच . . . #महाराष्ट्रदिन निमित्ताने ओळख करून घेऊ इथल्या अद्वितीय अशा या कलेची 👇👇
१. अजिंठा (औरंगाबाद): अजिंठ्यातली लेणी  चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत.एकूण ३० गुहांचा समावेश असणार्‍या या लेणीत हीनयान व महायान अशा दोन बौद्धपंथीय लेणींचा समावेश आहे. या लेणी औरंगाबाद पासून जवळपास १०६ किमी तर जळगाव पासून ६० किमी
अंतरावर आहेत.
२. वेरूळ(औरंगाबाद) : औरंगाबाद पासून जवळपास ३० किमी दूर असलेल्या या जगप्रसिद्ध लेण्यांमध्ये १२ बौद्ध, १७ हिंदू व ५ जैन लेणी आहेत. येथील कैलासमंदिर स्थापत्यशास्त्राचा अदभूत असा नमुना आहे.
Read 13 tweets
अगोदरच्या काळात बाबा बुवा लोक काहीतरी हातचालाखी करून त्याला चमत्कार दाखवून सर्वांसमोर विज्ञानाचा खून करायचे व लोक त्यांना देव समजून त्यांचा उधोउधो करायचे. तसे काही बाबा आजही बघायला भेटतात. म्हणून तर ट्रेन, बस, सार्वजनिक ठिकाणे या भोंदूबाबांच्या जाहिरातींनी गजबजून गेलेले दिसतात.
पण जसं जसं विज्ञान प्रगत होत गेलं तसा लोकांचा विज्ञानावर विश्वास वाढत गेला व या बाबांनी पण आपला पवित्रा बदलता घेतला. आजकाल हे बाबा लोक विज्ञानाने बनवलेल्या साधनांचा विज्ञानाची कत्तल करण्यासाठी सर्रास वापर करताना दिसतात.
काही जुन्या ग्रंथात, संस्कृतीत विज्ञान कसं प्रगत होत याबद्दल
अफवा पसरवतात, तर काही विज्ञानाची तोडमरोड करून आपला प्रॉपगंडा पसरवतात. यात त्यांचं महत्वाचं शस्त्र असत ते म्हणजे छद्मविज्ञान. छद्मविज्ञान हे वरून वरून विद्यानासारखच भासतं कारण यात हे लोक विज्ञानातील शब्द जसे की dimension, intensity, frequency,etc वापरताना दिसतात. काहीच शहानिशा
Read 6 tweets
#महाराष्ट्रदिन महाराष्ट्राचा इतिहास -
महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक,
इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
1.1. प्राचीनकाळ नावाचा उगम -
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर
Read 45 tweets
आजही आपल्या भारतभुमीकडे पाहीलं तर एक गोष्ट जी भारतीय समाजव्यवस्थेला वाळवीप्रमाणे खाते ती म्हणजे जातीप्रथा.हे जातीव्यवस्थेचं मूळ उपटण्यासाठी महाराष्ट्रात भागवतधर्मी संतांनी अतोनात प्रयत्न केलेले दिसतात.काही संत तर याच व्यवस्थेने वाळीत टाकले,त्यातील एक होते #संत_चोखामेळा..! (१/१३)
तेराव्या ( इसवी सन १३०० ) शतकात उदयास आलेल्या निस्सीम विठ्ठल भक्ताबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच! ज्ञानदेवांनी संत लोकशाहीचा पाया रोवला होता.तोच भागवतधर्म नामदेवांनी आणि चोखामेळा यांनी तत्कालीन उपेक्षित ठेवलेल्या समाजापुढे आणून ठेवण्याचं काम चोखपणे पार पाडलं. (२/१३)
एक महार म्हणून जन्माला आलेल्या चोखोबां मरेपर्यंत भेदभाव आणि शिवाशिव, उच्चनीच, शुद्र अति शुद्र, सामाजिक जीवन व वर्णव्यवस्था या गोष्टींनी होरपळून निघाले होते.

लहानपणापासून विठ्ठल भक्तीची कास धरलेल्या चोखोबांनी अखेरपर्यंत ईश्वरभजनाची, नामस्मरणाची संगत सोडली नाही. (३/१३)
Read 13 tweets
@LetsReadIndia
महाराष्ट्राचा इतिहास - संतपरंपरा :-
महाराष्ट्राला संतपरंपरेचा अजरामर वारसा लाभला आहे. या संतांच्या नावांचा विचार केला तर मनुष्याच्या जगण्याला दिशा देण्यासाठीच संतांची नावं क्रमवारीत असावी, असं वाटतं. मनुष्यदेहाच्या जडणघडणीचा विचार करायला लावणारे संत महाराष्ट्रात
कसे घडले आणि त्यांची क्रमवारी तशीच का, याचा मागोवा घेणारा हा विशेष लेख. मनुष्यजन्म आणि संतपरंपरा यांचा संबंध
‘मनुष्यजन्म’ हा म्हणावा तितक्या सहजपणे होत नाही. परंतु मनुष्य जन्म मिळूनसुद्धा काहींना मनुष्य जन्माचं सार कळत नाही. त्यावेळी संतांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्रात आजवर ५८ संत घडले असून त्यांनी समाजप्रबोधनाचं कार्य केलं आहे. विविध धर्मात अनेक संत होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्राला लाभलेल्या संताप्रमाणेच जगाला शिकवण्याचं, भलं-बुरं समजण्याइतपत प्रबोधन केले आहे. मनुष्य जन्माचा विचार केला तर मनुष्य जन्मात दोनच अवस्थेत सुख असते,
Read 42 tweets
एवढी महान संतसाहित्य परंपरा, ब्रिटिशकालीन समाजसुधारकांचा वारसा आणि महापुरुषांची अखंड फौज वारसरूपी पाठीशी असताना.. आज आपल्याला एका श्वासाच्या ऑक्सिजनसाठी तडफडावं लागत असेल तर त्या परंपरेचे खरे वारस आपण आहोत का..?
येत्या चार दिवसात महाराष्ट्र दिन आहे..

#महाराष्ट्रदिन #थ्रेड #म
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन॥
इति संत शिरोमणी जगद्गुरू श्री संत तुकोबाराय.

महाराष्ट्रसमाज आणि एकूणच भारतवर्षात गेली सताठशे वर्ष जी काही सामाजिक कूस बदल घडली. त्यात सिंहाचा वाटा हा संत साहित्यास जातो.
जवळपास १३व्या शतकाच्या उत्तरार्धापासून हा समाज एका अंदाधुंदीस सामोरा गेला, आजही जातोच आहे.त्यातून मार्ग दाखवण्याचे काम संत साहित्य इमानेइतबारे करत आहे.अगदी आजही.
संत साहित्याचा आवाका भला थोरला आहे. त्यातील प्राणप्रिय असणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकोबारायांविषयी सुरवातीला चार शब्द.
Read 20 tweets
#महाराष्ट्रदिन

चला, महाराष्ट्राची चौफेर ओळख करून घेऊ!

इतिहास, परंपरा, निसर्ग, विज्ञान, औद्योगिक विकास, सहकार अशा विविध पैलूंचा वारसा लाभलेला महाराष्ट्र नेमका आहे तरी कसा? महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण कधी थांबून याचा वेध घेतो का?
इतिहास, परंपरा, निसर्ग, विज्ञान, औद्योगिक विकास, सहकार अशा विविध पैलूंचा वारसा लाभलेला महाराष्ट्र नेमका आहे तरी कसा? महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण कधी थांबून याचा वेध घेतो का? याच प्रश्नांचे उत्तर म्हणून येत्या 'महाराष्ट्र दिना'च्या निमित्ताने 'लेट्स रीड फाऊंडेशन'च्या
माध्यमातून सोशल मीडियाद्वारे आपल्याच राज्याची विविधांगी ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी वाचकांनाच सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. आज, सोमवारपासून १ मेपर्यंत हा वाचन आणि चर्चासोहळा '@LetsReadIndia'या ट्विटर अकाउंटवर रंगणार आहे.
Read 9 tweets
सावता माळी हे एक मराठी संतकवी होते. अरण तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. सावता
महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी
ईश्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे सत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले.
#महाराष्ट्रदिन
@LetsReadIndia
Read 3 tweets
#महाराष्ट्रदिन
महाराष्ट्राबद्दल काही रंजक माहिती:

१. देशातील सर्वात मोठी रस्ते वाहतुक असलेले राज्य - सुमारे २,६७,५०० किमीची रस्ते वाहतुक महाराष्ट्रात आहे.

२. लोणार सरोवर - सुमारे ५२००० वर्षापुर्वी धुमकेतूच्या पुथ्वीशी झालेल्या धडकेमुळे बनलेले हे रहस्यमयी सरोवर.
३. नवापुर रेल्वे स्थानक - दोन राज्यात विभागलेले हे स्थानक अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा भाग गुजरातमध्ये आहे.

४. डब्बेवाल्यांचा संप - अखंड सेवा पुरवणारा मुंबईचा डबेवाला २०११ ला अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झाला व कामबंद ठेवले होते. #महाराष्ट्रदिन
५. प्रामाणिकपणा - देशाच्या तिजोरीमध्ये सर्वात जास्त कर हा महाराष्ट्रातून जमा होतो.

६. कोब्राचे गाव - सोलापुमधील शेतपाल गावात क्रोबा जातीच्या सापाच्या आरामासाठी प्रत्येक घरात एक विशिष्ट जागा असते. येथे आजपर्यंत एकालाही सर्पदंश झालेला नाही. #महाराष्ट्रदिन
Read 6 tweets
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा !
महाराष्ट्राचा विजय असो, #महाराष्ट्रदिन चिरायू होवो! जय हिंद, जय महाराष्ट्र❤
सर्व मराठी बांधवांना #महाराष्ट्रदिन#कामगारदिन निमित्त मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधील १०७ हुतात्मे
१) सिताराम बनाजी पवार
२) जोसेफ डेव्हिड पेजारकर
३) चिमणलाल डी. शेठ
४) भास्कर नारायण कामतेकर
५) रामचंद्र सेवाराम
६) शंकर खोटे
७) धर्माजी गंगाराम नागवेकर
८) रामचंद्र लक्ष्मण जाधव
९) के. जे. झेवियर
१०) पी. एस. जॉन
११) शरद जी. वाणी
Read 12 tweets
दि. १५.०५.१९६० : नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांना तत्कालीन सचिवालयाच्या इमारतीत राज्यपाल श्रीप्रकाश यांनी शपथ दिली.

#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday
दि. ०१.०५.१९६० : तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईत राजभवन येथे झालेल्या एका समारंभात महाराष्ट्राचा नकाशा प्रज्वलित केला आणि नवीन राज्य अस्तित्वात आल्याचे जाहीर केले.

#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday
२९ सप्टेंबर १९५६, संसदेवर धकड : प्रस्तावित महाराष्ट्र राज्यात मुंबईचा समावेश झालाच पाहिजे, या मागणीसाठी महिला कार्यकर्त्यांनी थेट संसदभवनावरच धडक दिली.

#महाराष्ट्रदिन
#स्वायत्त_महाराष्ट्र
#MHAutonomy
#maharashtraday
Read 18 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!