Discover and read the best of Twitter Threads about #स्वप्न

Most recents (4)

आमची ओळख झाली ती एका लग्नात. ओळखीने ओळख वाढली ..काही दिवस गेले ..फोन वर msg mdhe बोलण चालू झालं होत ..हळू हळू आमची मैत्री घट्ट होत होती ..एक दिवस भेटायचं ठरवलं आम्ही ..ती ही खुश होती भेटायचं म्हंटल्यावर ..आमच्या एकमेकांच्या आवडी निवडी समजायला लागल्या होत्या आम्हाला .
तिलाही मी आवडत असेन असा माझा अंदाज होता. भेटण्याच्या दिवशी मी मस्त व्हाइट शर्ट, ब्ल्यू पँट घालून ready होऊन निघालो ..घरातले लोक या बाबतीत लै हुशार त्यातले त्यात भावंडं...त्यांनी चिडवायला सुरुवात केली ..आज इतकं नटून थटून ..भानगड काय हाय ...मी आपली काय नाय .. टोलवा टोलवी केली
आणि निघालो ..भेटायचं ठरलं होत त्या ठिकाणी मी दहा एक मिनिटे लवकरच गेलो ठरलेले वेळेपेक्षा ...तिच्या येण्याची वाट बघत होतो ... वेळेत येतील ती माणसे कसली ..जवळ जवळ पंधरा वीस मिनिटे उशीर झालं तरी ही येईना ... राग येत होतच सोबत काळजी होती ..काही प्रोब्लेम तर आला नसेल ना ..
Read 10 tweets
पुण्याला एक दिवसाचं काम होतं म्हणून सकाळी पहाटे निघालो . इकडून जाताना कॅब सारख्या बऱ्याच गाड्या असतात आणि बस पेक्षा लवकर पोहचवत असतात म्हणून तसा प्रत्येक वेळेस पुण्याला जायचं म्हटलं की कॅब नी निघायचं . सकाळी १०-१०.३० वाजेपर्यंत पुण्यात टच करतात . आजही आलो पुण्यातील सगळी
कामे उरकली . आज जरा काम जास्त असल्याकारणाने थोडा उशीर झाला . प्रत्येक वेळेस ३ वाजता माघारी फिरणार तिथं ६ वाजले ..थोडा थोडा म्हणता म्हणता बऱ्याच वेळ कश्यात गेला समजलं नाही . स्वारगेट ल आलो बस बघितली तर होती एक शेवटची ६.३० ल डायरेक्ट मला खानापुरला सोडेल अशी म्हणून मग
तिचं बस पकडली म्हटल चला डायरेक्ट घरी तर जातोय . मस्त हेडफोन लाऊन गाणी लावली आणि झोपून गेलो . कात्रज मद्ये एक कोणीतरी बाजूला येऊन बसल्याची चाहूल लागली झोप महत्वाची म्हणून मी लक्षच नाही दिलं . बसलं असेल कोणीतरी जाऊदे म्हटलं . थोड्या वेळानी कानावर आवाज पडला ...
Read 33 tweets
मी, इस्ल्या(विशाल), ,आणि सोन्या विट्याहून सिनेमा बघून येत होतो . रात्रीचे साधारण ११.४५ वाजले असतील सिनेमा संपला आणि निघालो . तिघेच असल्याने एकच बाईक घेऊन गेलो होतो . इस्ल्याला लागल्या होत्या भुका " सोन्या गाडी थांबव आय*व्यां....पोटात कावळ वर्डायला लागल्यात " मधी बसलेला
इसल्या सोण्याला म्हणत होता. तोवर मी त्याला थांबवत " सोन्या गाडी थांबवू नको ह्याच्यात लै किडे हायती... घरातन ज्यून यी म्हटलं व्हतं तसच आलंय... ढाब्यावर खायची हौस हाय आयघालायला " . " शाप्या गाडी डुलत्या ऱ... हवा तर कमी न्हाय ना झाली ... " सोन्या मला थांबत म्हणाला ...
गाडी थांबली उतरलो आणि बघितल तर मागचं टायर पंक्चर...! " आता कशी आयघालायची ...झाली की पंचायत" ईसल्या डोक्याला हात लावून म्हंटला. " तामखडी पर्यंत ढकलत न्हावी लागल" सोन्या म्हंटला . " आलिया भोगासी असावे सादर .. ढकला आता काय" मी नाराज होत बोललो .. मस्त गप्पा मारत गाडी ढकलत चाललो होतो
Read 23 tweets
#खेळाडूपणा
#थ्रेड
एका शर्यतीत, केनियाचे प्रतिनिधित्व करणारा #धावपटू हाबेल मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो गोंधळून गेला आणि त्याने शर्यत पूर्ण केली असा वाटून धावणे सोडून दिले. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे Image
हे लक्षात येताच त्याने हाबेलकडे #धावणे चालू ठेवण्यासाठी ओरडण्यास सुरवात केली, परंतु हाबेलला #स्पॅनिश येत नाही आणि त्याला समजले नाही. म्हणून इव्हान ने अंतिम रेषेजवळ येताच त्याला पुढे ढकलले आणि त्याला #जिंकू दिले.
नंतर एका पत्रकाराने इव्हानला विचारले, "की तू असे का केले?" इव्हानने उत्तर दिले "माझे #स्वप्न आहे की एखाद्या दिवशी आपण अश्या जगात राहू जिकडे लोक आपल्या फायद्यापेक्षा जे बरोबर असेल ते करतील. मी त्याला जिंकू दिले नाही, तो #जिंकणार होता.
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!