Discover and read the best of Twitter Threads about #सह्याद्री

Most recents (5)

सह्याद्रीच्या कुशीत वळण घेत लालपरीने विसावा घेतला. थोडी दमलेली दिसली. जेवण झालं व पुन्हा नव्या जोमाने धावू लागली. कोकणचा #प्रवास भलताच वळणदार. #कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध! आजूबाजूला मागे पडणाऱ्या घरात डोकावून पाहता आलं असतं तर? विश्वाचे आर्त समजले असते!
#लालपरी ImageImage
#प्रवासी गाड्या ज्या जेवणाच्या अड्ड्यांवर थांबतात तिथे जेवण चांगलेच मिळते! कारण इथल्या जेवणाला अनोळखी लोकांच्या गप्पांची जोड असते. कोणी दिवसभर या हाटेलात बसला/ बसली तर काही वर्षे पुरेल इतके साहित्य, विषय आणि पात्रे मिळतील. आज अस्खलित #सातारी बोली ऐकायला मिळाली! 🤗
#प्रवास #अनुभव
#सह्याद्री.. महाराष्ट्रासारख्या राकट देशाला शोभून दिसणारी आणि स्वतः देखील साक्षात कालीमातेसारखी रौद्र सह्याद्री पर्वतरांग! त्यांच्या घनदाट जंगलात वसलेल्या संसारातून प्रवास करणारी ही #लालपरी!

सह्याद्रीला पाहून एकच वाक्य मनात येते, "असो हिमालय तुमचा, अमुचा केवळ माझा सह्यकडा!" ImageImageImageImage
Read 9 tweets
१०० नंबरी सोन!

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं की एक नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे - श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व

पूर्ण नाव - बळवंत मोरेश्वर पुरंदरे. १/

#बाबासाहेब_पुरंदरे_शताब्दी
लहानपणापासून इतिहासाचं बाळकडू मिळालेले बाबासाहेब पुढे जाऊन एवढं भव्य कार्य करू शकले त्याची गोम खरी त्यांच्या बालपणात आहे. खुद्द पुरंदरे घराण्यात जन्म झाला. अस घराणं ज्याने शेकडो वर्षे ह्या महाराष्ट्राची सेवा केली. अशा समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलेले बाबासाहेब. २/
बाबासाहेबांनी कधीही हातच राखून सांगितलं नाही. जे इतिहासात सापडलं ते तसच्या तस त्यांनी जगासमोर मांडलं. या महाराष्ट्राला कोमल, नाजूक नव्हे तर रांगडेपणाची सवय आहे पण कालौघात त्याच विस्मरण झालं. पण तो अज्ञानाचा थर बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं आणि ३/
Read 9 tweets
छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले शेकडो वर्षांनीसुद्धा ताठ मानेने अभेद्यपणे उभे आहेत.
शिवरायांनी गडकिल्ले तुम्हाला सिगरेट ओढायला जिंकले का?गड-किल्ल्यांच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट समोर येते,ती म्हणजे गड- किल्ल्यांवर होणारा व्यसनी लोकांचा धिंगाणा Image
वाढती व्यसनाधीनता आणि सामाजिक बेजबाबदारपणा यामुळे अनेक गडकिल्ले असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकले आहेत. कधी दारूचे अड्डे तर कधी गर्दुल्यांचे अड्डे तर कधी सिगरेट, हुक्का पिणे.गड-किल्ले हा केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक विषय नाहीये.
तर शिवरायांच्या, शंभूराजेंच्या,मावळ्यांच्या, आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्यांचे प्रतिक आहे.राज्‍याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत.नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी,शिवा काशीद अश्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी ३५० हुन अधिक गडकिल्ले जिंकले
Read 11 tweets
ट्रेकिंग करणे जितकं वाटत तितकं सोपं नाही.येण्या जाण्याची सोय बघणं.सगळ्यात अवघड म्हणजे पहाटेच्या साखर झोपेतून जागे होऊन सह्याद्रीची वाट धरण.आडवे उभे डोंगर चढण येड्या गबळ्यांच काम नाही.चालताना लागणार दम ,येणारा घाम हे सगळं सहन करावं लागतं.इथं सगळ्याची तयारी ठेवावी लागते.
उन्हासाठी सनब्लॉक, टोपी, गॉगल असेल , पावसासाठी वाऱ्यासाठी जॅकेट आणि थंडी साठी कानटोपी, थर्मल्स, स्वेटर...याच्यासाठी हे आणि त्याच्यासाठी ते..तरीही जोरात पाऊस यायच्या आत त्यात उबदार गोष्टींचा बंदोबस्त असून.थंडी वाजणार नाहीच तळपत्या उन्हानं सनबर्न होणार नाहीच याची काही खात्री नाही.
आपल्याला काय पाहिजे ते आपण करायचं निसर्गाला काय पाहिजे ते तो करून घेतो.ऊन, वारा, पाऊस, थंडी सह्याद्री प्रत्येक वेळी तुमची परीक्षा पाहत असतो.तिथे गेल्यावर कोण गरीब अन कोण श्रीमंत हा भेदभाव राहत नाही. छोट्याश्या सॅक मध्ये सगळं माववावं लागतं.
Read 11 tweets
गडावर हनुमानाची मूर्ती का असते?
वायूप्रमाणेच हनुमानाची गती, तेज व त्वरा आहेत. तो पर्वतप्राय प्रचंड रूप धारण करू शकतो; यथेष्ट रूप धारण करण्याचा त्याचा हा गुण तर खास यक्षवंशीय गुण आहे. नंतरच्या काळात हा पूर्वीचा यक्ष- हनुमान रामकथेशी जोडल्यामुळे आदर्श रामभक्त म्हणून जनमानसात रूढ
झाला. हनुमान शेंदूरलिप्त, रक्तवर्ण, भुतांचा स्वामी, रोगांपासून वाचविणारा, संततिदायक असल्याने गावात याचे स्थान पाण्याजवळ, पिंपळाखाली पारावर किंवा वेशीजवळ आढळते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे.
हे सैन्य ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अष्टौप्रहर डोळ्यात तेल घालून पहारा देत असे. रात्री-अपरात्री गडावर वावरणाऱ्या या मावळ्यांना तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी हनुमंताचा मोठा आधार वाटायचा. गावोगावच्या वेशींचे रक्षण करणारा हा देव आपले गडावरही रक्षण करेल
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!